अकोलेकरांना दिलासा; शनिवारीही बाजारपेठ राहणार सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:20 AM2021-07-30T04:20:29+5:302021-07-30T04:20:29+5:30

हे निर्बंध होणार शिथिल खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालय सुरू ठेवण्याची ...

Consolation to Akolekar; The market will continue on Saturday too! | अकोलेकरांना दिलासा; शनिवारीही बाजारपेठ राहणार सुरू!

अकोलेकरांना दिलासा; शनिवारीही बाजारपेठ राहणार सुरू!

Next

हे निर्बंध होणार शिथिल

खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालय सुरू ठेवण्याची मुभा राहील.

दुकाने, रेस्टॉरंट, सिनेमागृह आदींना अटींचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी मिळेल.

थिएटर्स, व्यायामशाळांना काही प्रमाणात निर्बंधातून सूट मिळू शकते.

कोरोना नियंत्रित, मात्र संकट कायम

जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आहे, मात्र कोरोनाचे पूर्णत: निर्मूलन झाले नाही. त्यामुळे अकोलेकरांवर अद्यापही कोविडचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

हे राहणार नियमित सुरू

अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

रेस्टॉरंट दुपारी ४ वाजातपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. त्यानंतर घरपोच सेवा सुरू राहील.

जिम, सलून, ब्यूटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. ए.सी. बंद ठेवूनच चालू राहतील.

सार्वजनिक मैदाने, आऊटडोर गेम्ससाठी दरदिवशी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.

खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ वाजतापर्यंत चालू राहतील.

अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.

सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ ५० टक्के उपस्थितीत केवळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजतापर्यंत करता येतील.

स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.

सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

Web Title: Consolation to Akolekar; The market will continue on Saturday too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.