जिल्हा परिषद शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांची बांधकामे लवकरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:55+5:302021-08-21T04:22:55+5:30
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या तसेच धोकादायक आणि मोडकळीस ...
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या तसेच धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांच्या ठिकाणी नवीन बांधकामे आणि स्वच्छतागृहांच्या बांधकामांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदमार्फत २७ जुलै रोजी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी ५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच एका शाळेतील स्वच्छतागृह बांधकामासाठी ३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मंजूर निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांची बांधकामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
समग्र शिक्षा बांधकाम विभाग
करणार बांधकामे!
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी शासनाकडून मंजूर निधीतून वर्गखोल्यांची बांधकामे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम तसेच समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्या आणि एक स्वच्छतागृह बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून समग्र शिक्षा अभियानच्या बांधकाम विभागामार्फत वर्गखोल्यांची बांधकामे करण्यात येणार आहेत.
दिलीप तायडे
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.