पिंजर येथील बांधकाम विभागाचे विश्रामगृह सहा वर्षांपासून बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:26+5:302021-03-05T04:19:26+5:30

पिंजर आणि बार्शीटाकळी येथील राजकीय नेत्यांनी कार्यकारी अभियंता यांचेकडे विश्रामगृह सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम ...

Construction department's rest house at Pinjar closed for six years! | पिंजर येथील बांधकाम विभागाचे विश्रामगृह सहा वर्षांपासून बंदच !

पिंजर येथील बांधकाम विभागाचे विश्रामगृह सहा वर्षांपासून बंदच !

Next

पिंजर आणि बार्शीटाकळी येथील राजकीय नेत्यांनी कार्यकारी अभियंता यांचेकडे विश्रामगृह सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. पिंजर येथील विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग मूर्तिजापूर यांच्या अंतर्गत असून, पिंजर हे तालुक्याचे केंद्रबिंदू आो. दिवंगत कॅबिनेट मंत्री भाऊसाहेब लहाने यांचे हे गाव आहे. पिंजरला मंगरूळपीर, कारंजा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आदी राज्य महामार्ग जोडलेले आहेत. येथील विश्रामगृहांमध्ये विविध कार्यक्रम, राजकीय बैठका, अनेक विभागांचे अधिकारी, कर्मचारी येथे मुक्कामी राहायचे. त्यामुळे महसूल मिळायचा. विश्रामगृह सुरू असल्याने पिंजर येथे रेलचेल होती. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी येथील कर्मचारी प्रवीण खणके यांनी विश्रामगृहांमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासून विश्रामगृह बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभाने येथे दुसरा कर्मचारी नियुक्त केला नाही. विश्रामगृह सुरू करण्याच्या मागणीकडे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बंडू राऊत यांनी केली आहे.

फोटो:

पिंजर येथील विश्रामगृह नियुक्तीसाठी कर्मचारी उपलब्ध नाही. फारसा महसूल मिळत नसल्याने, विश्रामगृह बंद केले आहे.

-अनंत गणोरकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

पिंजर येथील विश्रामगृह सुरू करण्याची वारंवार मागणी केली, परंतु अधिकारी लक्ष देत नाहीत. विश्रामगृह बंद असल्यामुळे, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरससोय होत आहे.

-सतीश पाटील गावंडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, बार्शीटाकळी

Web Title: Construction department's rest house at Pinjar closed for six years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.