शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोनचे निर्माण; फेरीवाल्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 02:29 PM2019-07-17T14:29:13+5:302019-07-17T14:29:18+5:30

मनपाच्या निर्देशानुसार ३६ फेरीवाल्यांना सहा बाय सहाच्या जागा प्रदान करण्यात आल्याची माहिती सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी दिली.

Construction of Hawker's Zones in 21 places in Akola city | शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोनचे निर्माण; फेरीवाल्यांना दिलासा

शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोनचे निर्माण; फेरीवाल्यांना दिलासा

Next

अकोला: मनपा प्रशासनाने शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, नियोजित ठिकाणीच नोंदणीकृत फेरीवाले व लघू व्यावसायिकांनी व्यवसाय करण्याचे आवाहन सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाच्यावतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. मनपाच्या निर्देशानुसार ३६ फेरीवाल्यांना सहा बाय सहाच्या जागा प्रदान करण्यात आल्याची माहिती सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी दिली.
शहरातील अतिक्रमणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून मनपाने २१ ठिकाणी हॉकर्स झोनचे निर्माण केले आहे. लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी प्रस्तावित हॉकर्स झोनमध्ये रीतसर नोंदणी करून त्या ठिकाणी कायदेशीरपणे व्यवसाय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ही जागा पोटभाडेपट्टी, विक्री व इतरांना हस्तांतर करू नये, केल्यास सदर जागा रद्द केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष इस्माइलभाई टीव्हीवाले, प्रवक्ते शौकतअली शौकत, जिल्हाध्यक्ष जयंत अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष साबीर हुसेन, बाळू शाहू, सुनील नवथळे, फिरोज खान, मोतीराम गावारगुरू, किरण कंकाळ, रफिक लोधी, आशिष मिश्रा, कान्हा करपे, बाबूभाई मेमन, शे. इमरान, रशीद खान, रतन बुंदेले, अर्जुन बनकर, राजीक खान, सुभाष कृपलानी, अमर कटारिया, नंदू पंजाबी, सलमान खान, अरविंद आगळे, ज्योती भुसारी, सविता गोटकडे, छाया तिडकेंसह बहुसंख्य फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 

 

Web Title: Construction of Hawker's Zones in 21 places in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.