आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींची कामे मंजूर पाणीटंचाई निवारण: सहा लाखांच्या अंदाजपत्रकांना मान्यता

By admin | Published: May 20, 2014 09:23 PM2014-05-20T21:23:46+5:302014-05-20T21:26:22+5:30

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपयांच्या अंदाजपत्रकांनाही मान्यता देण्यात आली आहे.

Construction of nine fuel wells in eight villages, sanctioned water scarcity clearance: approval of six lakh budgets | आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींची कामे मंजूर पाणीटंचाई निवारण: सहा लाखांच्या अंदाजपत्रकांना मान्यता

आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींची कामे मंजूर पाणीटंचाई निवारण: सहा लाखांच्या अंदाजपत्रकांना मान्यता

Next

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपयांच्या अंदाजपत्रकांनाही मान्यता देण्यात आली आहे.
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याला जिल्हाधिकार्‍यांमार्फत दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. कृती आराखड्यात जिल्ह्यातील १५८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या १२५ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या उपाययोजनांच्या कामांसाठी २ कोटी ८६ लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करून प्रशासकीय मंजुरी घेण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरूआहे. त्यामध्ये जिल्ह्यातील आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या विंधन विहिरींच्या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकांनाही जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. प्रशासकीय मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला. प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने संबंधित पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये लवकरच पाणीटंचाई निवारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत.

 

Web Title: Construction of nine fuel wells in eight villages, sanctioned water scarcity clearance: approval of six lakh budgets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.