शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाचे बांधकाम जूनच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:05 PM2019-02-04T13:05:55+5:302019-02-04T13:06:34+5:30
शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे.
- संजय खांडेकर
अकोला : मागील पालखी मार्गावर झालेला भीषण अपघात लक्षात घेत, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील पालखी मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यात शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. अकोला जिल्ह्यातील ५२ आणि वाशिम-बुलडाणा जिल्ह्यातील ३० असा एकूण ८२ किलोमीटर स्वतंत्र मार्गांवर अनेक सुसज्ज सेवा प्रदान करण्याचा संकल्प आहे.
राज्यात वारकरी सांप्रदायिकांची अनेक श्रद्धास्थाने असून, दरवर्षी वैष्णवांचा मेळा पंढरपुरात भरतो. राज्यभरातील कानाकोपऱ्यांतून पालख्या पंढरपुरात पोहोचतात. पालखी वाहणाºया भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी राज्याने महत्त्वाचे पाऊल उचलून स्वतंत्र मार्गांची निर्मिती सुरू केली आहे. महाराष्ट्रातील सर्व पालखी मार्ग जोडण्याच्या या प्रकल्पांवर हजारो कोटींचा खर्च होत आहे. अशाच पालखी मार्गांमध्ये शेगाव-पंढरपूर मार्ग आहे. स्वतंत्र असलेल्या या पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहे, झेब्रा क्रॉसिंग, वृक्षारोपण, थांब्यासाठी टिनशेड, पार्किंग, लोखंडी कठडे अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. या मार्गाचे उद्घाटन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, या प्रस्तावित ३७१ कोटींच्या निधीचा १८ कोटींचा पहिला टप्पा अकोला बांधकाम मंडळाकडे पोहोचला आहे. शेगाव-नागझरी-मेडशी-डव्हा-मालेगाव-बीबी-किनगाव जट्टू आणि पारस-निमकर्दा-गायगाव-भौरद-डाबकीपर्यंतचा मार्ग काढला जाणार आहे. यापैकी सर्वात जास्त मार्गाची लांबी अकोला जिल्ह्यातील मार्गाची आहे. वाशिम-बुलडाणा जिल्ह्यातील मार्गांचे अंतर त्या तुलनेत कमी आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया शेगावला पायदळ जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पायदळ वारी करणाºया भाविकांसाठी स्वतंत्र पालखी मार्ग सोयीचा होणार आहे.
जून महिन्यात पालखी येण्यापूर्वी हायब्रिड अॅन्युईटी अंतर्गत स्वतंत्र पालखी मार्ग कोणत्याही परिस्थितीत तयार करण्याचे निर्देश आहेत. यासाठी १८ कोटींचा निधी आला आहे.
-जी. व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला.