अकोल्यातील बांधकाम व्यवसायिक वाघ गोव्यात सापडले
By admin | Published: June 30, 2017 04:09 PM2017-06-30T16:09:28+5:302017-06-30T16:11:03+5:30
खडकीत राहणारे बांधकाम व्यावसायिक अमित वाघ हे पत्नी प्रियंका व दोन मुले स्पंदन व शाश्वत हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाली होते ते आता गोव्यात सापडल्याची माहीत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 30 - खडकीत राहणारे बांधकाम व्यावसायिक अमित वाघ हे पत्नी प्रियंका व दोन मुले स्पंदन व शाश्वत हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाली होते ते आता गोव्यात सापडल्याची माहीत आहे.
अकोल्यातील खदान पोलिसांसह सातारा पोलीस त्यांचा शोध घेत होते सातारा पोलिसांनी अमितच्या मोबाइलचे लोकेशन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मोबाइलचे लोकेशन गोवा असल्याचे दिसत होते. त्यामुळे अमितचे नातेवाईक, पोलीस त्याच्या शोधार्थ गुरुवारी गोव्याला रवाना झाले होते
अमित वाघ हा ३ जून रोजी पत्नी, मुलांसह स्वत:च्या कारसह अहमदनगरला गेला. या ठिकाणी त्याने चालकाला अकोल्यात परत पाठवून दिले. त्यानंतर त्याने पुणे, सातारा येथे जात असल्याचे सांगितले. ३ ते १३ जूनपर्यंत अमित त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांच्या संपर्कात होता; परंतु त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. काही दिवस उलटून गेल्यानंतरही अमितचा फोन आला नाही किंवा त्याच्यासोबत कुटुंबीयांचासुद्धा संपर्क झाला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.
अमित वाघ याची सासरवाडी अकोल्यातील कीर्ती नगरातील सुरेश वाने ही आहे. त्यांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु अमितसोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी खदान पोलीस ठाण्यात तो पत्नी, मुलांसह बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. खदान पोलिसांनी अमित वाघ याच्या मोबाइलचे लोकेशन शोधले. त्यावेळी त्याचे लोकेशन केरळमध्ये दर्शवित होते. खदान पोलिसांच्या सांगण्यानुसार, नातेवाइकांनी सातारा येथे जाऊन पोलिसांत तक्रार नोंदविली. सातारा पोलिसांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील दुसऱ्या मोबाइलचे लोकेशन शोधले. तेव्हा त्याचे लोकेशन गोवा असल्याचे माहिती पडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ गोव्याकडे मोर्चा वळविला व तेथे वाघ कुटुंब सापडले मात्र बेपत्ता होण्याचे कारण समोर आले नाही