ग्राहकांनी हक्कांबाबत जागरूक राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:48+5:302021-03-16T04:19:48+5:30

अकोला : ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून दिला जातो. तथापि ...

Consumers should be aware of their rights | ग्राहकांनी हक्कांबाबत जागरूक राहावे

ग्राहकांनी हक्कांबाबत जागरूक राहावे

Next

अकोला : ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून दिला जातो. तथापि ग्राहकांनीही आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे व अन्यायकारक व्यापार पद्धतीस बळी पडू नये,अ से आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी सोमवारी केले.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन वेबिनारद्वारे आयोजित ‘जागतिक ग्राहक दिन’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघाचे अध्यक्ष संजय पाठक तसेच सहायक आयुक्त अन्न व प्रशासन, वजन मापे निरीक्षक, वीज वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी, गॅस एजन्सीचे वितरक व निरीक्षण अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ग्राहक दिन ऑनलाईन वेबिनारद्वारे घेण्यात आला. यावेळी एस. एम. उंटवाले यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या सुधारित कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, तपासणी, तक्रारी, खटला चालविणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागविणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करणे व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात दंड आकारणे इत्यादी अधिकारांबाबत एस. एम. उंटवाले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शीतल मोरखडे यांनी, प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी तर आभार प्रदर्शन अन्नधान्य वितरण अधिकारी बी. डी. अरखराव यांनी केले.

.........................फोटो......................

Web Title: Consumers should be aware of their rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.