घुसरवाडी येथे दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:54+5:302021-07-18T04:14:54+5:30

म्हातोडी : येथून जवळच असलेल्या ग्राम घुसरवाडी येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात ...

Contaminated water supply at Ghusarwadi | घुसरवाडी येथे दूषित पाण्याचा पुरवठा

घुसरवाडी येथे दूषित पाण्याचा पुरवठा

Next

म्हातोडी : येथून जवळच असलेल्या ग्राम घुसरवाडी येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ठिकठिकाणी लिकेज आहे. या लिकेजमधून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अकोला तालुक्यातील घुसरवाडी येथे जलवाहिनीद्वारा पाणीपुरवठा केला जातो. यासाठी गावात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यामधून गावातील घाण पाणी जलवाहिनीत जात असून, ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. तसेच गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, गावातील विद्युत पोलवर लाइट नाहीत. गावात अस्वच्छता निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (फोटो)

------------------------

वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष

जलवाहिनीला गळती लागल्याची माहिती नागरिकांनी ग्रा.पं. सदस्य, सचिव व प्रशासकांना दिली. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. खारपाणपट्ट्यात असलेल्या घुसरवाडी येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

---------------------

घुसरवाडी येथील जलवाहिनी लिकेज झाल्याची माहिती मिळाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येईल.

- जी.एस. गवळी, सचिव, गट ग्रामपंचायत, लाखोंडा बु.

-----------------------------------------------------

गावात चिखल झाला असल्यास त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात येईल. तसेच वीज खांबावर विद्युत दिवे बसविण्यात येतील.

- जी.एस. गावंडे, गट ग्रामपंचायत प्रशासक, लाखोंडा बु.

Web Title: Contaminated water supply at Ghusarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.