लरातो महाविद्यालयात कोविडोत्तर अर्थव्यस्थेवर विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:33+5:302021-03-07T04:17:33+5:30
प्रा. डॉ. योगेश अग्रवाल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी विशद केली. प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके यांनी देशांतर्गत असलेली विविध ...
प्रा. डॉ. योगेश अग्रवाल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी विशद केली. प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके यांनी देशांतर्गत असलेली विविध क्षेत्राची आर्थिक स्थिती व त्यावर शासकीय अर्थसहाय्य तसेच उपाययोजना यावर विस्तृत विवेचन केले.
परिषदचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. एम.आर सिंगारिया यांनी उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र व कृषी क्षेत्र यावर कोविडचा प्रभाव, जागतिक वाणिज्य स्थिती व केंद्र शासनाच्या आर्थिक व सहाय्यकारी इतर योजना यांची उपयोगिता स्पष्ट केली.
परिषदेचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता यांनी अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या स्थितीचा आढावा घेऊन, कोविड समस्येचे निवारण कशाप्रकारे होईल हे स्पष्टपणे समोर मांडले. परिषदेचे सह समन्वयक डॉ. श्रीकांत पाटील यांनी शिक्षण क्षेत्र व अर्थव्यवस्था यांची सांगड घालत परिषदेची उपयोगीता यावर प्रकाश टाकला.
तांत्रिक व्याख्यानमालेत अध्यक्ष डॉ. दिलीप एस. चव्हाण यांनी कृषी उद्योग व सेवा क्षेत्रातील घडामोडी सोबतच पायाभूत क्षेत्र व जागतिक स्तरावरील अर्थविषयक संशोधन संस्थांचे अहवाल सादर करून, अर्थव्यवस्थेबाबत विचार स्पष्ट केले व पुढील काळात अर्थव्यवस्था मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र जैन, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे, कार्यकारी सदस्य व प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या परिषदमध्ये सहभागी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी शोध निबंध सादर केले.
कार्यक्रमामध्ये प्राध्यापक प्रा. डॉ.अनिल तिरकर यांनी मुख्य अतिथी व उद्घाटक यांचा परिचय करून दिला.
संचालन प्रा. डॉ. हरीश बडवाईक, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. स्वाती तिवारी यांनी केले.
तांत्रिक बाजू प्रा. महेश बाहेती यांनी सांभाळले. प्रा. डॉ. निलेश चोटिया व प्रा. डॉ. मोनिका साबू यांनी आयोजनामध्ये परिश्रम घेतले.