कंत्राटी पदे रद्द, राज्यभरातील आरोग्य कर्मचारी दोन दिवसांत होणार बेरोजगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:50+5:302021-08-29T04:20:50+5:30
दोन दिवसांत रोजगार जाणार, पुढे काय करावे? शासनाच्या पत्रानुसार, कोविड अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा रोजगार दोन दिवसांत जाणार आहे. त्यामुळे ...
दोन दिवसांत रोजगार जाणार, पुढे काय करावे?
शासनाच्या पत्रानुसार, कोविड अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा रोजगार दोन दिवसांत जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे आता पुढे काय करावे, असा प्रश्न या कंत्राटी कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे.
पुढील कारभार असा चालणार
हॉस्पिटल मॅनेजर आणि स्टोअर ऑफिसर ही पदे पूर्णत: रद्द करण्यात आली.
विशेषज्ञांचे मानधन हे राष्ट्रीय आराेग्य अभियानातून दिले जाणार आहे.
नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आयुष डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांचा भार असणार आहे.
नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स, एक्सरे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट यांच्यावरच कोविडची जबाबदारी राहणार आहे.