‘जीएमसी’मधील कंत्राटी वार्ड बॉय, सफाई कामगारांचे वेतन रखडले
By atul.jaiswal | Published: July 11, 2018 03:35 PM2018-07-11T15:35:10+5:302018-07-11T15:36:42+5:30
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले वॉर्ड बॉय व सफाई कामगारांचे गत चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याची बाब समोर आली आहे.
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले वॉर्ड बॉय व सफाई कामगारांचे गत चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याची बाब समोर आली आहे.
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा व साफसफाईचे काम करण्यासाठी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जानेवारी महिन्यात ही कामे करण्यासाठी बाह्यस्त्रोत कामगार नेमण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. सदर कंपनीने कंत्राटी तत्वावर वॉर्ड बॉय व सफाई कामगार म्हणून एकून ७० जणांची नियुक्ती केली. या कर्मचाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षकांचीही नेमणूक कंपनीने केली. या कर्मचाºयांना मासिक सात हजार ५०० रुपये वेतन निश्चित करण्यात आले. तेव्हापासून हे कर्मचारी सर्वोपचार रुग्णालयात कर्तव्यरत आहेत. कामावर रुजू झाल्यापासून केवळ एकदाच कामाचा मोबदला मिळाला, त्यानंतर चार महिन्यांपासून कोणतेही वेतन मिळाले नसल्याचे या कामगारांचे म्हणने आहे. या कर्मचाºयांमध्ये १७ महिलांचाही समावेश आहे. गत चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कामावरून कमी करतील या भीतीने कोणीही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे या कर्मचाºयांनी खासगीत बोलताना सांगितले.