वेतनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:06 PM2019-05-21T13:06:39+5:302019-05-21T13:06:50+5:30

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात त्रयस्थ संस्थेमार्फत कार्यरत कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतनासाठी सोमवार, २० मेपासून कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले.

 Contract Workers agitation for sallary | वेतनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

वेतनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Next

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात त्रयस्थ संस्थेमार्फत कार्यरत कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतनासाठी सोमवार, २० मेपासून कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. पहिल्याच दिवशी सर्वोपचार रुग्णालयात आंदोलनाचा प्रभाव दिसून आला.
रिक्त पदांची कमी भरून काढावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात क्रिस्टल इन्टिग्रेटेड सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेमार्फत कक्षसेवक आणि सफाई कामगारांची कंत्राटी तत्त्वावर ६७ पदे भरण्यात आली आहेत. या कर्मचाºयांमुळे सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला मोठा हातभार लाभला असून, जीएमसीमधील रेंगाळलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचा मुद्दा असून, या कर्मचाºयांमार्फत जीएमसीमध्ये स्वच्छतेची कामेही केली जातात; मात्र मे २०१८ पासून या कर्मचाºयांना वेतनच मिळाले नाही. जवळपास वर्षभराच्या कालावधीत या कर्मचाºयांकडून विनावेतन काम करून घेण्यात येत आहे. वेतन न मिळाल्याने या कर्मचाºयांचे आर्थिक गणित बिघडले असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाºयांनी अधिष्ठाता यांच्यासोबतच जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना वारंवार निवेदन दिले; परंतु, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. अखेर या कर्मचाºयांनी सोमवारपासून आंदोलनाचे शस्त्र उपसले. सोमवारी सकाळपासूनच या कंत्राटी कर्मचाºयांनी काम बंद ठेवून धरणे दिले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सर्वोपचार रुग्णालयाला फटका बसला असून, अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी परसली आहे. आंदोलनामध्ये नीतेश माले, तुषार गिरी, राजू शिरसाट, प्रवीण ठोंबरे, सुरेंद्र सोळंके, विजय जामनिक, निखिल राऊत, सुनीता गायकवाड, सरिता मानकर, अनुराधा तायडे, मीना चंदाले, लक्ष्मी डोंगरे, दीक्षा बनसोड, सरस्वती अंभेरे, शीला पाटोळे, अमोल कुंडारकर, शुभांगी शिरसाट, जया कल्याणी, कपिला खंडारे, राहुल सरकटे, अनिल उपरवट, कपिल ओव्हाळ, छाया खंडारे, संतोष मेहेसरे व वसीम खान यांचा सहभाग आहे.

राज्य स्तरावर करणार आंदोलन!
क्रिस्टल या त्रयस्थ कंपनींतर्गत राज्यभरात कंत्राटी कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. अकोल्यातील कंत्राटी कर्मचाºयांप्रमाणेच इतर ठिकाणीही कंत्राटी कर्मचाºयांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे वेतनाचा हा प्रश्न निकाली न लागल्यास राज्यस्तरावर आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

क्रिस्टलची आडकाठी
कंत्राटी कर्मचाºयांच्या वेतनाची देयके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे ट्रेझरीमध्ये वळती केली आहेत. त्यामुळे क्रिस्टल कंपनीतर्फे कर्मचाºयांना वेतन देणे अनिवार्य आहे; परंतु कंपनीतर्फे कर्मचाºयांच्या वेतनामध्ये आडकाठी आणली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title:  Contract Workers agitation for sallary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.