कोरोना काळात अकोल्याच्या पशुवैद्यक संस्थेचे योगदान मोलाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:47+5:302021-07-01T04:14:47+5:30
माफसूअंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यावतीने आयोजित ‘श्वान रोग निदान तथा उपचार पध्दतीमधील नवीन क्षीतीजे’ या ...
माफसूअंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यावतीने आयोजित ‘श्वान रोग निदान तथा उपचार पध्दतीमधील नवीन क्षीतीजे’ या संकल्पनेवर आधारित पाचदिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी श्वानतज्ज्ञ तथा माजी अधिष्ठाता बेंगलुरू डॉ. एस. यथीराज, अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण प्रा. डॉ. ए. पी. सोमकुंवर आणि संचालक विस्तार प्रा. डॉ. विलास आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण समारोपप्रसंगी पशुतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. पी. व्हार्शिणी सुरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने होते.
प्रशिक्षण समन्वयक तथा चिकित्सालयीन अधीक्षक प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. प्रशिक्षणात देशभरातून एकूण ४१८ प्राध्यापक, विद्यार्थी, पशुवैद्यकीय अधिकारी, संशोधक आदी सहभागी झाले, तर सदर प्रशिक्षणात प्रा. डॉ. राजेंद्र वेलणकर- मुंबई, प्रा. डॉ. सतीश कुमार हैदराबाद, प्रा. डॉ. विजयकुमार चेन्नई, डॉ. नीतू सैनी लुधियाना, डॉ. मुकेश कुमार श्रीवास्तव मथुरा, डॉ. डी. सुमती, डॉ. बर्नीधरण चेन्नई, डॉ. अमृतकुमार कोरुटला, डॉ. शिबू सायमन केरळ व डॉ. संभाजी चव्हाण आदी देशपातळीवरील व्याख्यात्यांनी श्वानांचे रोग व उपचारांसंबधी अत्याधुनिक माहिती याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसमन्वयक डॉ. किशोर पजई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पकंज हासे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी सहसमन्वयक म्हणून डॉ. महेशकुमार इंगवले, डॉ. प्रवीण बनकर, आलेम्बिक फार्माचे उपाध्यक्ष श्री. पी. करुणानिथी, डॉ. संतोष शिंदे व चमूने परिश्रम घेतले.