अत्यावश्यक सेवा वाहन परवान्यासाठी 'आरटीओ'मध्ये नियंत्रण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:18 PM2020-03-29T16:18:55+5:302020-03-29T16:19:00+5:30
अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहु वाहनांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देष देण्यात आले आहेत.
अकोला : कोरोना विषाणू संसगार्मुळे उदभलेल्या आपत्तकालीन परिस्थितीत वाहतुक परवाने देण्यासाठी ऊप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती सहा प्रादेशिक परिहवन अधिकारी गोपाल वरोकार यांनी दिली आहे.
राज्याचे परिवहन आयुक्त यांनी २६ मार्च रोजी दिलेल्या निदेर्शानुसार परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहु वाहनांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देष देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे व कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सदरचे प्रमाणपत्र हे केवळ लॉकडाऊनच्या कालावधीपुरते वैध राहणार आहे. सध्या लागु असलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक मालवाहु वाहनधारकांना कार्यालयात येणे अडचणीचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी कार्यालयामध्येच विशेष कर्मचारी नेमून एक कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. मालवाहु मालकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत येऊन अर्ज केल्यास त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी गोपाल वारोकार यांनी स्पष्ट केले आहे.ज्या वाहन मालकांना कार्यालयात येणे शक्य नाही त्यांना ईमेलद्वारे अर्ज केल्यानंतर त्यांची पडताळणी करून आॅनलाईन प्रमाण पत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.