वादग्रस्त कर्मचारी नासीर हुसेन हिवताप विभागात रुजू

By admin | Published: December 9, 2014 12:26 AM2014-12-09T00:26:26+5:302014-12-09T00:26:26+5:30

केवळ विभाग बदलला; ठोस कारवाई नाहीच.

The controversial staff, Nasir Hossain, in the malaria department | वादग्रस्त कर्मचारी नासीर हुसेन हिवताप विभागात रुजू

वादग्रस्त कर्मचारी नासीर हुसेन हिवताप विभागात रुजू

Next

अकोला : सहाय्यक संचालक हिवताप विभागात कार्यरत असलेले वादग्रस्त कर्मचारी नासीर हुसेन अखेर सोमवारी जिल्हा हिवताप विभागात रुजू झाले आहेत. नासीर हुसेन यांनी महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना असभ्य भाषेत वागणूक दिल्याचा प्रकार 'लोकमत'ने उजेडात आणल्यानंतर आरोग्य उपसंचालकांनी त्यांची तातडीने बदली केली, हे विशेष. सहाय्यक संचालक हिवताप विभागात कार्यरत असताना तांत्रिक विभागप्रमुख असे शासनाचे कुठलेही पद नसताना नासीर हुसेन यांनी स्वयंघोषित पद निर्माण करून या विभागात दादागिरी सुरू केली होती. हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.एम.एम. राठोड यांच्या पाठराखणीमुळे महिला कर्मचार्‍यांशी असभ्य भाषेत बोलण्यासारखे प्रताप नासीर हुसेन यांनी केले आहेत. गत चार वर्षांपूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना वागणूक दिली होती. या प्रकरणाच्या तक्रारीही आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आल्या; मात्र त्यावेळी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ३0 वर्षांत एकदाही बदली न झाल्याने नासीर हुसेन विभागात वेगळय़ा अविर्भावात वागत होते. ह्यलोकमतह्णने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर कर्मचार्‍यास तातडीने जिल्हा हिवताप विभागात रुजू होण्याचे आदेश दिले. हा कर्मचारीही सोमवारी हिवताप कार्यालयात रुजू झाला आहे.

Web Title: The controversial staff, Nasir Hossain, in the malaria department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.