तीन ग्रामपंचायतींसह ५६ सदस्य अविरोध, दोन जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:43+5:302021-01-09T04:14:43+5:30

अकोट : अकोट तालुक्यातील मुदत संपलेल्या ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतच्या एकूण ३३६ सदस्यांच्या जागांपैकी ५६ सदस्यांची निवड ...

Controversy over 56 members including three Gram Panchayats, two seats vacant | तीन ग्रामपंचायतींसह ५६ सदस्य अविरोध, दोन जागा रिक्त

तीन ग्रामपंचायतींसह ५६ सदस्य अविरोध, दोन जागा रिक्त

Next

अकोट : अकोट तालुक्यातील मुदत संपलेल्या ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतच्या एकूण ३३६ सदस्यांच्या जागांपैकी ५६ सदस्यांची निवड अविरोध निश्चित झाली आहे. यामध्ये मंचनपूर, कोहा व लाडेगाव या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णतः अविरोध निश्चित झाली आहे, तर उमेदवारी अर्ज आले नसल्याने दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान, गावागावात राजकारण तापले असून, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे.

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रा.पं. अविरोध निश्चित झाल्याने ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे १३५ प्रभागांतील २७८ जागांकरिता ७०५ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, नांदखेड व हनवाडी येथील एसटी महिला प्रवर्गातील जागेकरिता उमेदवारी अर्ज आला नाही. त्यामुळे दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान, १९ गावांत एकूण ५६ सदस्यांची अविरोध निवड निश्चित झाली आहे.

यामध्ये कावसा बु.-३, पातोंडा-५, दिनोडा-२, देवर्डा-१, हनवाडी-५, चंडिकापूर-३, कोहा (बोरी)-७, पणज-२, खिरकुंड बु.-१, वरूर-१, मंचनपूर-७, मक्रमपूर-२, एदलापूर-२, पिंप्री खु.-२, खैरखेड.-२, अडगाव खु.-१, लाडेगाव- ७, आलेवाडी-२, नांदखेड-१ यांचा समावेश आहे. तर उमरा, जऊळका, आसेगाव बाजार, बोर्डी, मोहाळा, आंबोडा, सावरा, कुटासा, जऊळखेड बु., दनोरी, चोहोट्टाबाजार, किनखेड, करोडी, देवरी, पळसोद, पारळा, कवठा बु.,रुईखेड, वडाळी देशमुख या ग्रामपंचायतींमध्ये एकही अविरोध उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे ३५ ग्रामपंचायतींमधील २७८ जागांवर ७०५ उमेदवारांची निवडून येण्यासाठी चांगलीच कसरत सुरू आहे. गावागावांत राजकीय हेवेदावे सुरू आहेत. प्रचाराचा वेग वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत गटातटाच्या बैठका सुरू आहेत. पॅनलची जुळवाजुळव झाली असून काही गावांत पॅनल नव्हे तर सरळ एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली जात आहे.

Web Title: Controversy over 56 members including three Gram Panchayats, two seats vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.