मनपात संत जगनाडे महाराज जयंतीवरून वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:48+5:302020-12-09T04:14:48+5:30
मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता नगरसचिव अनिल बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात ...
मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता नगरसचिव अनिल बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी राजेश कोंडाणे, अविनाश वासनिक, संजय चव्हाण, राजेश सोनाग्रे, सतीश वखारिया, पंकज देवळे, नीलम खत्री, उमाकांत डगवाले, किशोर सोनटक्के, पूर्णाजी पाटील, पुरुषोत्तम इंगळे, रवींद्र शिंदे, सुरक्षा रक्षक लता चोरपगार, सुनंदा आटोटे, शोभा पांडे, आर.पी. खडसे, विनोद वानखडे आदींची उपस्थिती होती. यादरम्यान, प्रशासनाने जगनाडे महाराज यांची जयंती का साजरी केली नाही, असा आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभागृहात दाखल हाेत संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. यावेळी आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, नगरसेविका किरण बोराखडे, प्रतिभा अवचार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते.
नगरसचिवांनी नियाेजित वेळेनुसार संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी केली. शासन निर्णयानुसार थाेर पुरुष, संतांची जयंती साजरी केली जाते.
-संजय कापडणीस आयुक्त मनपा
मनपा प्रशासनाला संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा विसर पडला हाेता. त्याची आठवण आम्ही करून दिल्यावर त्यांनी प्रतिमेला हारार्पण केले.
-राजेंद्र पाताेडे प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी