वीज वितरणच्या कंझरा उपकेंद्रास आग
By admin | Published: April 17, 2017 07:40 PM2017-04-17T19:40:33+5:302017-04-17T19:40:33+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील कंझारा परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रास १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आग लागली.
मूर्तिजापूर : तालुक्यातील कंझारा परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रास १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आग लागली. आग लवकर आटोक्यात आल्याने वित्त हानी टळल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीच्या अकोला विभागांतर्गत येणाऱ्या कंझारा येथील उपकेंद्रास सोमवारी आग लागली. या आगीत उपकेंद्रातील रिकामे ड्रम आणि वेस्टेज तार जळाले. उपकेंद्रालगत असलेल्या शेतातील क चरा शेतकऱ्याने पेटवला. या कचऱ्याची आग उपकेंद्रापर्यंत पोहचली. या आगीत खुल्या जागेत ठेवलेले १२ ते १५ ड्रम आणि वेस्टेज तार आगीत जळाली. उपकेंद्रावरील उपकार्यकारी अभियंता श्वेता वानखडे, ज्युनिअर टेक्निशयन कविता वाकोडे, सचिन तामने, अ.सलीम यांनी ही आग विझविली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मूर्तिजापूर नगर परिषदेचे बंब नादुरुस्त असल्याने व दर्यापूर येथे एकच बंब असल्याने कारंजा येथून बंब येईपर्यंत बराच उशीर झाला. सुदैवाने ही आग मोठी नव्हती अन्यथा मोठे नुकसान झाले असते. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.