बंजारा संस्कृतीतील विचारधनास ग्रंथरूप देण्यासाठीच संमेलन

By admin | Published: February 1, 2016 02:12 AM2016-02-01T02:12:48+5:302016-02-01T02:12:48+5:30

बंजारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांचे प्रतिपादन.

Convention on the issue of Banjara civilization; | बंजारा संस्कृतीतील विचारधनास ग्रंथरूप देण्यासाठीच संमेलन

बंजारा संस्कृतीतील विचारधनास ग्रंथरूप देण्यासाठीच संमेलन

Next

वाशिम : बंजारा समाजाची संस्कृती प्राचीन असून, मौखिक स्वरूपात आहे. तांडा संस्कृती ही आतापर्यंत केवळ मौखिक स्वरूपात होती, ती पुस्तकबद्ध होऊन लिखित स्वरूपात यावी, याकरिता ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्राच्यावतीने अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी रविवारी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन वाशिम येथील विठ्ठलवाडीत ६ व ७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले. या संमेलनाची माहिती देण्याकरिता रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून संमेलनाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील प्राचार्य गबरूसिंग चव्हाण, स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, सुभाष राठोड, आर. डी. राठोड, एन. टी. जाधव, अँड. जगदीश पवार, प्रेम राठोड, प्रा. विजय राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ टी. सी. राठोड म्हणाले, की राष्ट्रीय स्तरावरील वाशिम येथे होणारे हे पहिले संमेलन आहे. समाजातील साहित्यिकांना एक पीठ निर्माण व्हावे, याकरिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाच्या अतिप्राचीन संस्कृतीवर प्रकाशझोत टाकून आजच्या तरुणांना या सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्ती करण्यात येणार असल्याचे गबरूसिंग चव्हाण म्हणाले. बंजारा समाज हा तांड्यात राहणार आहे. तसेच श्रमीक संस्कृतीचा उपासक आहे. येथे मातृसत्ताक संस्कृती होती. नवीन संशोधकांनी याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. या संमेलनात देशातील आठ ते नऊ राज्यांतील साहित्यिकांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा संमेलनात ६ फेब्रुवारी राजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी पोहरादेवी येथील संत रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर १0.३0 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य गबरूसिंह राठोड राहणार आहेत. स्वागताध्यक्ष एआयबीएसएसचे राज्य अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड आहेत. उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार मनोहर नाईक करतील. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लक्ष्मणराव गायकवाड, भिमणीपुत्र मोहन नाईक यांची राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. शंकर नाईक, तेलंगणातील खासदार सीताराम नाईक, एआयबीएसएसचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजूसिंह नाईक, आ. हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मखराम पवार, किनवटचे आमदार प्रदीप नाईक, एआयबीएसएसचे कार्यकारी अध्यक्ष अमरसिंह तिलावत, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचा सामावेश राहणार आहे. दुपारी २ वाजता ह्यबंजारा साहित्य प्रेरणा - दशा, दिशा और स्वरूपह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ४ वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी ह्यबंजारा समाज के महामानवों का मानवतावादी दृष्टिकोनह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता ह्यबंजारा समाज की वर्तमान समस्याएं एवम् उपायह्ण यावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप होणार असून, अध्यक्षस्थानी राजाराम जाधव राहणार आहेत.

Web Title: Convention on the issue of Banjara civilization;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.