अचलपूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:02+5:302021-09-22T04:22:02+5:30
मूर्तिजापूर : येथील अचलपूर-यवतमाळ शंकुतला नॅरोगेज रेल्वे इंग्रज काळापासून सुरू होती. गेल्या सात वर्षांपासून शकुंतला नॅरोगेज रेल्वे बंद पडली ...
मूर्तिजापूर : येथील अचलपूर-यवतमाळ शंकुतला नॅरोगेज रेल्वे इंग्रज काळापासून सुरू होती. गेल्या सात वर्षांपासून शकुंतला नॅरोगेज रेल्वे बंद पडली असून, या रेल्वे मार्गाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या दृष्टिकोनातून रेल्वे लाइन सुरू करणे गरजेचे असल्याने या मार्गावरील शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्य रेल्वेमंत्री दानवे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतावेळी शुभम मोहोड, दिलीप इनवते, प्रदीप पाटील, शुभम कदम, संदीप घाटे, भूषण चोरपगार, राजू गावंडे, युवराज मोहोड, ऐश्वर्या मोहोड, राजेंद्र मोहोड व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती निखिल ठाकरे व तुषार धाबाळे यांनी दिली. निवेदनाच्या प्रति खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री बच्चू कडू, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना देण्यात आले आहे.