सहकारातील ‘वसंत’ हरपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:21 PM2018-08-11T12:21:56+5:302018-08-11T12:29:17+5:30

Cooperative leader vasantrao dhotre no more | सहकारातील ‘वसंत’ हरपला!

सहकारातील ‘वसंत’ हरपला!

googlenewsNext
ठळक मुद्देवसंतराव रामराव धोत्रे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३८ मध्ये अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावी शेतकरी कुटुंबात झाला.१९६५ ते १९८६ पर्यंत त्यांनी अकोला सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्षपद भूषविले. १९८६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सहकार व वने राज्यमंत्री पदी कामगिरी बजावली.

अकोला : वऱ्हाडच्या सहकार, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावून राज्यात नावलौकिक प्राप्त करू न देणारे कणखर, शिस्तप्रिय नेतृत्व, सहकारातील ‘वसंत’ हरपल्याने वऱ्हाडच्या शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
वसंतराव रामराव धोत्रे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३८ मध्ये अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावी शेतकरी कुटुंबात झाला. नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील बी.कॉम.ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी १९६० साली सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांचा कल सहकार क्षेत्राकडे होता. १९७१ मध्ये त्यांनी सहकार क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले ते सभापतीपदी. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या कार्यकारी मंडळात पहिले सभापती म्हणून सहकार कारकिर्दीला सुरुवात करणारे वसंतराव धोत्रे या भूमिपुत्राने सामाजिक बांधीलकी जोपासत, शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले. सहकार क्षेत्राला नवा आयाम देताना शेतकºयांचा फायदा किती, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. अवघ्या ३४ व्या वर्षी ते पहिले सभापती झाले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. तब्बल २३ वर्ष त्यांनी हे पद भूषविले. १९६५ ते १९८६ पर्यंत त्यांनी अकोला सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्षपद भूषविले. १९६७ ते १९८५ असे १९ वर्ष ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. शेतकºयांनी शेतीला पूरक जोडधंदा करावा, ही त्यांची त्याचवेळी दूरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी १९६५ मध्ये अकोला जिल्हा कुक्कुट विकास सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेचे ते १९८६ पर्यंत २१ वर्ष अध्यक्ष होते. महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे ते १९८५ ते ९८ पर्यंत १३ वर्ष संचालक होते. १९८९ ते ९७ पर्यंत आठ वर्ष अकोला जिल्हा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. १९९१ ते २००१ पर्यंत १० वर्ष ते दि नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष होते. शेतकºयांना कापसाचे योग्य दर मिळावे, कापसावर येथेच प्रक्रिया व्हावी, कापूस उत्पादक शेतकरी सक्षम व्हावेत, असा त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा. शेकडो शेतकºयांच्या मुलांना या सूतगिरणीच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला. यामध्ये वसंतराव धोत्रे यांचा मोलाचा वाटा होता. १९९३ ते २००० पर्यंत आठ वर्ष ते पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक होते. १९९७ ते २००२ पर्यंत चार वर्ष महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक म्हणून काम केले. १९९१ ते १९९३ पर्यंत असे तीन वर्ष न्यू दिल्ली येथील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-आॅप. लि. चे संचालक होते.



राजकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी!
वसंतराव धोत्रे यांच्यातील काम करण्याची हातोटी, प्रशासकीय, संघटन कौशल्याचा गुण बघता त्यांना १९८५ मध्ये भारतीय राष्टÑीय काँग्रेसने बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयी झाले. १९८६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सहकार व वने राज्यमंत्री पदी कामगिरी बजावली. १९८८ पर्यंत त्यांनी हे पद भूषविले. या दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली. शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्यास पुढाकार घेतला.

शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर
देशाचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाची धुरा वसंतराव धोत्रे यांनी सलग दहा वर्ष समर्थपणे सांभाळली, बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी नवे उपक्रम सुरू केले. १९९७ पासून त्यांनी या संस्थेचे कामकाज १० वर्ष बघितले.

शेतकºयांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना
होतकरू , कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू करणारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील पहिली बाजार समिती आहे. वसंतराव धोत्रे यांच्या संकल्पनेतून त्यांचे चिरंजीव शिरीष धोत्रे यांनी ही योजना सुरू केली. पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहणाºया शेतकºयांच्या शेकडो पाल्यांना लाखो रुपये शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम आजमितीस सुरू आहे.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत
कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. सर्पदंश व इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या वारसांना लाखो रुपयांची आर्थिक मदत करणारी ही राज्यातील एकमेव बाजार समिती आहे. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आजही सुरू आहे. हीच सामाजिक बांधीलकी त्यांनी जोपासली असून, शिरीष धोत्रे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडीत आहेत. शेतकºयांना कृषी अवजारांसाठी अनुदान उपलब्ध करू न दिले जात आहे. वसंतराव धोत्रे यांचा वैचारिक वारसा पुढे रेटत शिरीष धोत्रे यांनी या बाजार समितीला नफ्यात ठेवले आहे, अशी ही राज्यातील एकमेव बाजार समिती आहे.

 

Web Title: Cooperative leader vasantrao dhotre no more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.