तांब्या-पितळीची भांडी स्वयंपाकघरातून होताहेत बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:37+5:302021-04-08T04:18:37+5:30

पूर्वी काही मोजक्याच लोकांच्या घरात स्टीलची भांडी दिसायची. यावरून त्या व्यक्तीची श्रीमंती दिसून यायची. आता तर हीच स्टीलची भांडी ...

Copper-brass utensils are coming out of the kitchen! | तांब्या-पितळीची भांडी स्वयंपाकघरातून होताहेत बाद!

तांब्या-पितळीची भांडी स्वयंपाकघरातून होताहेत बाद!

Next

पूर्वी काही मोजक्याच लोकांच्या घरात स्टीलची भांडी दिसायची. यावरून त्या व्यक्तीची श्रीमंती दिसून यायची. आता तर हीच स्टीलची भांडी सर्वसामान्यांच्या घरात पोहोचली. स्वयंपाकगृह चमकदार स्टील भांड्याच्या प्रकाशाने उजळून निघाले. पूर्वी काळसर, तांबट, पिवळी भांडी स्वयंपाकघरात दिसायची. ती आता पडद्याआड जात आहेत. महिलांच्या विचारसरणीतील बदल व नवनवीन धातूच्या जसे प्लास्टिक, फायबर, अशा विविध वस्तूंचे आक्रमण होत असल्याने, महिला वर्गाने स्टीलची भांडी खरेदी करणेदेखील कमी केले. भांड्यांची गरज प्रत्येकाच्याच घरात असते. गरजेची भांडी उपलब्ध नसली, तर घराला घरपण येत नाही. बहुधा घरातील भांडी खरेदी एकदाच केली जात असते. कार्यक्रमाला जायचे म्हटल्यास यजमानांना भेट घेण्यासाठी स्टील, ॲल्युमिनियम, तांबे किंवा पितळीची भांडी आवर्जून दिली जायची. यामुळे भांडे व्यवसायात वर्षभर तेजी राहायची. त्यातही दिवाळीच्या दिवसांत महिला वर्गाकडून भांड्यांची प्रामुख्याने खरेदी व्हायची; परंतु आता त्याही पुढे जात, प्लास्टिक, फायबरचा वाढता वापर, तसेच इलेक्ट्रॉनिक युग असल्याने स्वयंपाकघरातील तांबा-पितळीची भांडी मागे पडली. यास पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव कारणीभूत ठरत आहे. आजघडीला नातेवाइकांकडे कार्यक्रमास जायचे असल्यास महिलावर्गात गृहसजावटीच्या वस्तू व पुष्पगुच्छ भेट देण्यास अधिक पसंती दिली जात आहे. त्याला कारण म्हणजे भेटवस्तूंना आकर्षक पॅकिंग करून मिळत असल्याने देणाऱ्यांच्या आत्मविश्वासात भर पडत आहे. शिवाय महागाईच्या काळात ग्राहक अधिक चौकस झाल्याने कमी किमतीत मोठी व आकर्षक वस्तू घेण्याकडे तो वळत आहे. परिणामी, महिलावर्गाच्या आधुनिक विचारसरणीतून होत असलेल्या खरेदीचा फटका विशेषकरून भांडे व्यावसायिकांना बसत आहे. पूर्वी वापरात असलेल्या तांब्या- पितळीची भांडी महागाईमुळे वापरण्यास त्रासदायक वाटत असल्याने गृहिणींनी त्याकडे पाठ फिरविली आहे.

फोटो :

Web Title: Copper-brass utensils are coming out of the kitchen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.