कोरोना: ५३ पॉझिटिव्ह, २३ जणांना डिस्चार्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:22+5:302021-01-09T04:15:22+5:30

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दरराेज वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त आरटीपीसीआर चाचणीमध्ये ४८ पॉझिटिव्ह अहवालामध्ये सिंधी ...

Corona: 53 positive, 23 discharged! | कोरोना: ५३ पॉझिटिव्ह, २३ जणांना डिस्चार्ज!

कोरोना: ५३ पॉझिटिव्ह, २३ जणांना डिस्चार्ज!

Next

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दरराेज वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त आरटीपीसीआर चाचणीमध्ये ४८ पॉझिटिव्ह अहवालामध्ये सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड व जिल्हा परिषद कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यू खेतान नगर, गीता नगर, लहरिया नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट, कौलखेड, उमरा ता. अकोट, देऊळगाव ता. पातूर, पीडीकेव्ही हॉस्टेल, बाजोरिया ले-आउट, राधाकिसन प्लॉट, काँग्रेस नगर, शांती नगर, मुंगशी, न्यू राधाकिसन प्लॉट, खेतान नगर, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, न्यू हिंगणा वाशिम रोड, न्यू तापडिया नगर, गांधी चौक, व्हीएचबी कॉलनी, श्रद्धा नगर, कपीलवास्तू नगर, गणेश नगर, रामदास पेठ, तारफैल व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये अकोट येथील तीन, तर गोरक्षण रोड येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. या सोबतच २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ९ हजार ९१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ३२३ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

सद्यस्थितीत ५८७ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे असून, आरोग्य विभागामार्फत त्यांना विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात येत आहे.

बेफिकीरी ठरतेय घातक

बाजारपेठेत अनेक जण बेफिकीरीने वावरताना दिसून येतात; मात्र काही ठिकाणी होम आयसोलेशनमधील रुग्णदेखील बेफिकीरीने फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुग्णांची ही बेफिकीरी इतरांसाठीदेखील घातक ठरू शकते. त्यामुळे अशा रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Web Title: Corona: 53 positive, 23 discharged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.