कोरोना : लसीकरणासाठी अकोल्यात ८२ ‘आयएलआर’ दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:42+5:302021-01-21T04:17:42+5:30
जिल्हानिहाय ‘आयएलआर’चे वितरण जिल्हा - आयएलआरची संख्या अकोला - ७ अकोला मनपा - ७ अमरावती - १२ अमरावती मनपा ...
जिल्हानिहाय ‘आयएलआर’चे वितरण
जिल्हा - आयएलआरची संख्या
अकोला - ७
अकोला मनपा - ७
अमरावती - १२
अमरावती मनपा - ६
वाशिम - ७
बुलडाणा - २०
यवतमाळ - २३
मोठ्या आयएलआरची प्रतीक्षा
अमरावती मनपासाठी लहान आयएलआर व्यतिरिक्त ३ मोठे आयएलआर आणि ३ डीप फ्रिजर प्राप्त होणार होते. यापैकी तीन डीप फ्रिजर अमरावती आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, तीन मोठ्या आयएलआरची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. ही उपकरणे लवकरच अमरावती महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवारी विभागासाठी ८२ आयएलआर प्राप्त झाले. लस साठवणुकीसाठी आवश्यक क्षमता असून, आयएलआर आल्याने ती आणखी बळकट होणार आहे.
डॉ. राजकुमार चव्हाण, प्रभारी आरोग्य उपसंचालक, अकोला