कोरोना : अकोला@ १००४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:18 AM2021-05-23T04:18:27+5:302021-05-23T04:18:27+5:30

कोरोनाची दुसरी लाट अकोलाकरांसाठी जास्त घातक ठरली असून, मागील तीन महिन्यांत मृतकांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मे महिन्यात आतापर्यंतचे ...

Corona: Akola @ 1004 | कोरोना : अकोला@ १००४

कोरोना : अकोला@ १००४

Next

कोरोनाची दुसरी लाट अकोलाकरांसाठी जास्त घातक ठरली असून, मागील तीन महिन्यांत मृतकांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मे महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक बळी गेले असून, अशी स्थिती जिल्ह्यात पहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलाकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट ठाण मांडून आहे. आतापर्यंत कोरोनाचे १००४ बळी गेले असून, अकोलाकरांची चिंता आणखी वाढली आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून सक्रिय झालेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शेकडोंनी वाढत आहे. त्याच बरोबर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस सुरुवात झाली असून, महिनाभरात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. मार्च महिन्यात हा आकडा ८६ पाेहोचला, तर एप्रिल महिन्यात २२५ मृत्यू झाले होते. मे महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले. कोविड फैलावाची स्थिती अशीच कायम राहिल्यास खाटा, ऑक्सिजन आणि इतर साधनसामग्रीची टंचाई भासून परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

२२ दिवसांत ३१५ मृत्यू

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ८४ मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले होते. मार्च महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. एकट्या एप्रिल महिन्यात २२५ रुग्णांना जीव गमवावा लागला होता, मात्र मे महिन्यातील २२ दिवसांतच ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येते.

असा आहे कोरोनाचा आलेख

महिना- रुग्ण - मृत्यू

एप्रिल - २८ - ०३

मे - ५५३ - २९

जून - ९६९ - ४७

जुलै - १०८७ - ३४

ऑगस्ट - १४०० - ४७

सप्टेंबर - ३४६८ - ८४

ऑक्टोबर - ८९३ - ४५

नोव्हेंबर - १०३३ - १२

डिसेंबर - १०५८ - २९

जानेवारी - ११३५ - १४

फेब्रुवारी - ४५२७ - ३१

मार्च - ११५५५ - ८६

एप्रिल - १२,१२४ - २२५

मे - १३,१८७ - ३१५ (२२ मेपर्यंत)

Web Title: Corona: Akola @ 1004

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.