मूर्तिजापूर तालुक्यात कलापथकाद्वारे ‘कोरोना’ जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:27+5:302021-02-06T04:33:27+5:30
पातूर-नंदापूर येथील सुगरण शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला विकास बहुद्देशीय संस्थेच्या कलापथकाने कोविड-१९ काय आहे, हा आजार टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात ...
पातूर-नंदापूर येथील सुगरण शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला विकास बहुद्देशीय संस्थेच्या कलापथकाने कोविड-१९ काय आहे, हा आजार टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात व कोणती काळजी घेतली पाहिजे यासाठी कलापथ मंडळाने गाण्याच्या व बतावणीच्या माध्यमातून जनजागृती केली व कोविड-१९ शासकीय विविध योजनांची माहिती दिली. यात निरंजन भगत, विद्या भगत, संजय सुरडकर, रवी तेलगोटे, योगेश पुंडकर, आलोकरत्न भगत, दौलत पडघन, माया भगत या कलावंतांनी आपली कला सादर केली, कार्यक्रमाला सभापती ऊर्मिला डाबेराव, उपसभापती सुभाष राऊत, पंचायत समिती सदस्य दादाराव किर्दक, प्रकाश वानरे, जया तायडे, सहायक गटविकास अधिकारी व्ही. व्ही. वानखडे, बबनराव डाबेराव, संजय नाईक आदी उपस्थित होते.(फोटो)