पिंजर परिसरात दोन बालकांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:06+5:302021-05-19T04:19:06+5:30
पिंजर परिसरातील पिंपळगाव चांभारे येथील एक पाचवर्षीय बालक व पिंजर येथील एक वर्षीय चिमुकल्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून ...
पिंजर परिसरातील पिंपळगाव चांभारे येथील एक पाचवर्षीय बालक व पिंजर येथील एक वर्षीय चिमुकल्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. बालकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने पिंजर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूंची संख्याही वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली असून, या लाटेत बालक व युवांना सार्वाधिक धोका होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. पिंजर परिसरात दोन बालकांना कोरोनाची बाधा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
------------------
पिंजर परिसरात पाचवर्षीय बालक व एक वर्षीय चिमुकल्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करावा. घाबरून जाण्याचे कारण नाही.
-डाॅ. एम. एस. आगलावे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंजर.