कोरोना : २३ दिवसांत दोघांचाच बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:41+5:302021-08-24T04:23:41+5:30
जुलै महिन्यात ५८ बळी जून महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने बाधित होऊन तब्बल ५८ रुग्णांचा बळी गेला होता. जुलैमध्ये मृतांचा ...
जुलै महिन्यात ५८ बळी
जून महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने बाधित होऊन तब्बल ५८ रुग्णांचा बळी गेला होता. जुलैमध्ये मृतांचा आकडा सात एवढा नोंदवला गेला. तर ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी संसर्गजन्य आजाराच्या वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण पोषक असते. अशात कोविडची लागण जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येते.
पावसाळ्याचे वातावरण असल्याने सर्दी, खोकला, अंगदुखी, तापीसारखी लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात.
ही लक्षणे म्हणजे कोरोना नसली तरी लक्षणे कोविडसारखीच असल्याने आजार अंगावर न काढता विलंब टाळा व वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.