Corona Cases : १७ दिवसांत कोरोनाने घेतला १०२ लोकांचा बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 10:58 AM2021-04-18T10:58:49+5:302021-04-18T11:01:23+5:30

Corona Cases: एप्रिल महिना घातक ठरला असून, पहिल्या १७ दिवसांतच १०२ रुग्णांचा बळी गेला.

Corona Cases: 102 killed in 17 days | Corona Cases : १७ दिवसांत कोरोनाने घेतला १०२ लोकांचा बळी !

Corona Cases : १७ दिवसांत कोरोनाने घेतला १०२ लोकांचा बळी !

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ठरला घातक ठरला आहे. मार्च महिन्यात ८६ रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिना घातक ठरला असून, पहिल्या १७ दिवसांतच १०२ रुग्णांचा बळी गेला. गत वर्षभरातील ही सर्वाधिक गंभीर स्थिती असली, तरी अनेक जण कोरोनाला हलक्यात घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचे लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविडची चाचणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारास सुरुवात करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फेब्रुवारी ते १७ एप्रिल पर्यंतच्या या ७५ दिवसांत २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी १०२ मृत्यू हे एप्रिल महिन्यातील मागील १७ दिवसांतील आहेत. ही आकडेवारी थक्क करणारी असली, तरी अनेक जण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षभरात सप्टेंबरनंतर मार्च महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले होते, मात्र एप्रिलमध्ये मृत्यूचा हा वेग झपाट्याने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात १४ रुग्णांचा, तर फेब्रुवारी महिन्यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात ८६ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. एप्रिल महिन्यातील परिस्थिती त्याहून गंभीर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

गंभीर रुग्णांमध्ये ग्रामीणचे प्रमाण ८० टक्के

अकोला शहरात गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण हे सुमारे ८० टक्के असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे तपासणीकडे दुर्लक्ष, विलंबाने उपचारास होणारी सुरुवात ही दोन कारणे वाढत्या मृत्यूचे कारण ठरत असल्याचे डाॅक्टर्स सांगतात.

 

अर्ली डिटेक्शनचे आव्हानच

जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेल्या केंद्राच्या पथकाने मृत्यू रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शन करून त्वरित उपचार सुरू करा अशा सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या. मात्र जेथे रुग्णांचे रिपोर्ट पाच ते सहा दिवसांनी प्राप्त होतात. तेथे अर्ली डिटेक्शनचे काम यंत्रणा कितपत प्रभावीपणे करेल हा प्रश्न आहे.

असे वाढले रुग्ण (२०-२१)

महिना - रुग्ण - मृत्यू

एप्रिल - ०३

मे - २९

जून - ४७

जुलै - ३४

ऑगस्ट - ४७

सप्टेंबर - ८४

ऑक्टोबर - ४५

नोव्हेंबर - १२

डिसेंबर - २९

जानेवारी - १४

फेब्रुवारी - ३१

मार्च - ८६

एप्रिल - १०२ (१७ एप्रिलपर्यंत)

Web Title: Corona Cases: 102 killed in 17 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.