Corona Cases in Akola : ११ जणांचा मृत्यू, ५९९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:26 AM2021-05-03T10:26:10+5:302021-05-03T10:26:19+5:30
Corona Cases in Akola: रविवारी आणखी ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावण्याचे सत्र सुरूच असून, रविवारी आणखी ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांचा आकडा वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय असून, रविवारी ४४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी मास्कचा वापर, नियमित हात धुणे, इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शिवसेना वसाहत येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णासह जठारपेठ येथील ८५ वर्षीय पुरुष, आगर येथील ७० वर्षीय पुरुष, हिंगणा म्हैसपूर येथील ७५ वर्षीय महिला, भारती प्लॉट येथील ७२ वर्षीय पुरुष, शिवार येथील ६४ वर्षीय पुरुष, गांधीग्राम येथील ५० वर्षीय महिला, रोहणा अकोला येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे, तसेच खासगी रुग्णालयात मलकापूर येथील ६५ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर येथील ३० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश होता. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज वाढत असून, आतापर्यंत ७१३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. रविवारी ५९९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यापैकी ३७६ आरटीपीसीआर, तर २२६ रॅपिड चाचणीचे अहवाल आहेत. रुग्णसंख्या वाढत असली, तरी रविवारी ४४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासादेखील मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४१ हजार ३२२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ३५ हजार ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
तालुका - रुग्णसंख्या
मूर्तिजापूर -३९
अकोट -३३
बाळापूर -३७
तेल्हारा -०४
बार्शीटाकळी - १६
पातूर -२५
अकोला -२२२ (ग्रामीण-३६,मनपा-१८६)
२२ रुग्णांवर अंत्यसंस्कार
अकाेला शहरातील स्मशानभूमीत रविवारी संध्याकाळपर्यंत २२ काेराेनाबाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११ रुग्ण, तसेच खासगी व इतर जिल्ह्यांतील १२ रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याचे अंत्यसंस्कार करणाऱ्या चमूने दिली आहे.