Corona Cases in Akola : आणखी ११ जणांचा मृत्यू, ५२५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:55 PM2021-05-22T19:55:12+5:302021-05-22T19:55:19+5:30
Corona Cases in Akola: २२ मे रोजी आणखी ११जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा १००४ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, २२ मे रोजी आणखी ११जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा १००४ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३५८, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १६७ असे एकूण ६७० रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ५३,३४७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,४६८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,११० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये अकोट येथील ५५ वर्षीय महिला, बाळापूर येथील ६० वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ७९ वर्षीय पुरुष, खडकी येथील ६२ वर्षीय महिला,चैतन्य नगर अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष, टाकळी ता.बाळापूर येथील ६० वर्षीय महिला, मनारखेड ता. बाळापूर येथील ३५ वर्षीय महिला, अकोला येथील ५७ वर्षीय पुरुष,
मोठी उमरी येथील ३५ वर्षीय महिला, अकोली जहागीर येथील ४५ वर्षीय पुरुष, मांडवा ता. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्य
मुर्तिजापुर-२५, अकोट-४९, बाळापूर-२९, तेल्हारा-५, बार्शी टाकळी-१८, पातूर-५३, अकोला-१७९. (अकोला ग्रामीण-५२, अकोला मनपा क्षेत्र-१२७)
४९४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, पिकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, जिल्हा परिषद भवन येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, खासगी रुग्णालयांमध्ील ३३ तर होम आयसोलेशन मधील ४०० अशा एकूण ४९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,६२६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३,३४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४५,७१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १००४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,६२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.