Corona Cases in Akola : आणखी १३ जणांचा मृत्यू, ४०८ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 07:35 PM2021-04-28T19:35:41+5:302021-04-28T19:35:50+5:30
Corona Cases in Akola : आणखी १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६६८ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार, २८ एप्रिल रोजी आणखी १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६६८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६९, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये १३० अशा एकूण ४०८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३८,९५१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २००७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७३८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये
मुर्तिजापूर तालुक्यातील दोन, अकोट तालुक्यातील १०, बाळापूर तालुक्यातील २५, तेल्हारा तालुक्यातील पाच, बार्शी टाकळी तालुक्यातील ६३, पातूर तालुक्यातील २८ आणि अकोला-१३६ (अकोला ग्रामीण-२६, अकोला मनपा क्षेत्र-११०) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा झाला मृत्यू
तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला
जूने शहर येथील ६८ वर्षीय पुरुष
येळवन ता. बार्शीटाकळी येथील २९ वर्षीय महिला
गौतम नगर येथील ८१ वर्षीय पुरुष
बेलुरा उमरा ता.अकोट येथील ६० वर्षीय पुरुष
चोहट्टा बाजार ता. अकोट येथील ५२ वर्षीय पुरुष
केशव नगर येथील ८२ वर्षीय पुरुष
एमआयडीसी नं.४ शिवणी येथील ७० वर्षीय पुरुष
उमरी ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष
कोळंबी ता. मुर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष
शिवर येथील २९ वर्षीय पुरुष
अकोट येथील ६० वर्षीय पुरुष
शास्त्री नगर येथील ७८ वर्षीय महिला
७२८ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील ११, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, यकीन हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, देवसार हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६१५ अशा एकूण ७२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,०२० उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८,९५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३३,२६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.