Corona Cases in Akola : आणखी १४ पॉझिटिव्ह, २३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 07:34 PM2021-06-30T19:34:20+5:302021-06-30T19:34:27+5:30
Corona Cases in Akola: ३० जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये नऊ, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये पाच अशा एकूण १४ नव्या रुग्णांची नोंद झाली.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, बुधवार, ३० जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये नऊ, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये पाच अशा एकूण १४ नव्या रुग्णांची नोंद झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ६९० जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी मुर्तिजापूर तालुक्यात एक, तेल्हारा तालुक्यात एक, अकोट तालुक्यात दोन, अकोला ग्रामीणमध्ये दोन आणि अकोला मनपा क्षेत्रात तीन असे एकूण नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ६८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी करण्यात आलेल्या ११५५ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले.
२३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील १५ अशा एकूण २३ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३७७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,०९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य स्थितीत ३७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.