Corona Cases in Akola : १६ जणांची कोरोनावर मात, १२ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 06:36 PM2021-06-27T18:36:09+5:302021-06-27T18:36:15+5:30
Corona Cases in Akola: आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाच व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सात अशा केवळ १२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरली असून, रविवार, २७ जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाच व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सात अशा केवळ १२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रविवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण ३८४ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ३७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या पाच जणांमध्ये अकोट तालुक्यातील एक, बाळापूर तालुक्यातील एक, अकोला ग्रामीण एक व अकोला मनपा क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात ८५६ रॅपिड चाचण्या झाल्या. यामध्ये केवळ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
१६ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, खासगी कोविड रुग्णालयांमधील १२ अशा एकूण १६ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४२२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५६८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,०२० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.