Corona Cases in Akola : आणखी १७ बळी, ५३७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:34 AM2021-05-17T10:34:09+5:302021-05-17T10:34:27+5:30
Corona Virus update : आणखी १७ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९०८ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, १६ मे रोजी आणखी १७ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९०८ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४७, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १९० असे एकूण ५३७ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५०,२७२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,२४० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,८९३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये खदान येथील ५६ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ४१ वर्षीय महिला, डाबकी रोड येथील ७० वर्षीय महिला, शंकर नगर येथील ७० वर्षीय महिला, कौलखेड येथील ७९ वर्षीय पुरुष, बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष, पातूर येथील ६२ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ५५ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ७० वर्षीय पुरुष, रामदासपेठ येथील ५० वर्षीय पुरुष, अकोट येथील ३९ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ५१ वर्षीय महिला, तारफैल येथील ६८ वर्षीय पुरुष, अकोट येथील ४८ वर्षीय महिला, रणपिसे नगर येथील १९ वर्षीय तरुण, मलकापूर ता.मुर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर- ३५, अकोट- १४, बाळापूर- ६२, तेल्हारा- ४९, बार्शी टाकळी- १०, पातूर- सहा, अकोला- १७१ (अकोला ग्रामीण- ३५, अकोला मनपा क्षेत्र- १३६)
५६५ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २४, आर्युवेदिक महाविद्यालय येथील१०, समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १२, उपजिल्हा रुगणालय येथील दोन, खासगी रुगणालयांमधील ४९ आणि होम आयसोलेशन मधील ४६० अशा एकूण ५६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५०,२७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४२,५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.