Corona Cases in Akola : आणखी १८ बळी, ३८७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 08:16 PM2021-05-03T20:16:08+5:302021-05-03T20:16:14+5:30
Corona Cases in Akola: सोमवार, ३ मे रोजी जिल्ह्यात आणखी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७२१वर पोहोचला आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, सोमवार, ३ मे रोजी जिल्ह्यात आणखी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ७२१वर पोहोचला आहे, तर गत चोवीस तासात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५६, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये १३१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांचा आकडा ४१,७०९ वर पोहोचला आहे.
सकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,३२० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ३८, अकोट तालुक्यातील २७, बाळापूर तालुक्यातील ४, तेल्हारा तालुक्यातील २५, बार्शी टाकळी तालुक्यातील ४, पातूर तालुक्यातील ३८ आणि अकोला - १२० (अकोला ग्रामीण- २०, अकोला मनपा क्षेत्र- १००) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा मृत्यू
जनूना, ता. बार्शीटाकळी येथील ४८ वर्षीय पुरुष
सिटी कोतवाली येथील ७० वर्षीय पुरुष
वनी रंभापूर येथील ६५ वर्षीय महिला
पातूर येथील २७ वर्षीय पुरुष
संतोषनगर येथील ५३ वर्षीय पुरुष
पातूर येथील ५० वर्षीय महिला
हातगाव, ता. मूर्तिजापूर येथील ७१ वर्षीय महिला
म्हैसपूर येथील ४२ वर्षीय पुरुष
दहिहांडा येथील ४५ वर्षीय पुरुष
चोहट्टा बाजार येथील ५० वर्षीय महिला
रोहणा येथील २७ वर्षीय पुरुष
सांगळूद येथील ६५ वर्षीय महिला
म्हातोडी येथील ४८ वर्षीय महिला
विवरा येथील ६० वर्षीय पुरुष
कोठारी लेआऊट येथील ६५ वर्षीय पुरुष
३५ वर्षीय अज्ञात पुरुष
डाबकी रोड येथील १९ वर्षीय पुरुष
अकोट येथील २६ वर्षीय महिला
४३८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८, आरकेटी महाविद्यालय येथील चार, अवघाते हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, क्रिस्टल हॉस्पिटल येथील एक, बबन हॉस्पिटल येथील दोन, इन्फीनिटी हॉस्पिटल येथील तीन, आयकॉन हॉस्पिटल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, इंदिरा हॉस्पिटल येथील एक, फातिमा हॉस्पिटल येथील दोन, के. एस. पाटील हॉस्पिटल येथील तीन, आधार हॉस्पिटल येथील नऊ, स्कायलार्क हॉटेल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर, अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पिटल येथील दोन, समाजकल्याण वसतिगृह येथील दोन, लोहाणा केअर सेंटर येथील तीन, कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथील एक, कोविड केअर सेंटर, तेल्हारा येथील एक, केअर हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशनमधील ३३० अशा एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,४५५ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४१,७०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३५,५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,४५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.