Corona Cases in Akola : आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 19:38 IST2021-05-17T19:38:04+5:302021-05-17T19:38:10+5:30
Corona Cases in Akola: १७ मे रोजी आणखी १९ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९२७ झाला आहे.

Corona Cases in Akola : आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, १७ मे रोजी आणखी १९ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९२७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४४, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये ११५ असे एकूण ४५९ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५०,७३१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,४४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,१२४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. बाळापूर येथील ८० वर्षीय महिला, तांदळी ता. पातूर येथील ५२ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ४५ वर्षीय महिला, बाळापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ३४ वर्षीय महिला, अकोट येथील ५४ वर्षीय महिला, रतनलाल प्लॉट अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष, केशवनगर येथील ५९ वर्षीय महिला, अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ४८ वर्षीय पुरुष, म्हैसपूर येथील ५० वर्षीय पुरुष, पारस येथील ७५ वर्षीय पुरुष,
राजंदा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष, जवाहर नगर येथील ७४ वर्षीय महिला, डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला, दहिहांडा येथील ४५ वर्षीय महिला, डोंगरगाव ता. बाळापूर येथील ६२ वर्षीय महिला, वाडेगाव ता. बाळापूर येथील ३८ वर्षीय पुरुष व तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर- २०, अकोट- ९४, बाळापूर-०२, तेल्हारा- ३०, बार्शी टाकळी- २९, पातूर- ७३, अकोला- ९६ (अकोला ग्रामीण- ३८, अकोला मनपा क्षेत्र- ५८)
५५२ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९,बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून तीन, केअर हॉस्पिटल येथून सहा,
पॉलिटेक्निक कॉलेज मुर्तिजापूर येथील ४१, मुलींचे वसतीगृह देवरी अकोट येथून ५०, खैरे उम्मत हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, गोपाळराव खेडकर कॉलेज तेल्हारा येथील १४, समाज कल्याण वसतीगृह अकोला येथून पाच, खासगी रुग्णालयांमधून १३ तर होम आयसोलेशन मधील ३४२ अशा एकूण ५५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,६६३ ॲक्टिव्ह रुगण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५०,७३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४३,१४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,६६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.