Corona Cases in Akola : शनिवारी दिवसभरात २७ रुग्णांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 10:23 AM2021-05-16T10:23:43+5:302021-05-16T10:24:54+5:30
Corona Cases in Akola : दिवसभरात २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. शनिवारी हे सत्र सुरू असून दिवसभरात २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतांचा दिवसभरातील उच्चांकी आकडा आहे. दुसरीकडे ५२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ही स्थिती पाहता नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे. प्राप्त अहवालानुसार, शनिवारी २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये कुटासा येथील ८० वर्षीय महिलेसह पातूर येथील ५६ वर्षीय पुरुष, चोहट्टा बाजार ता.अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष, अकाेट तालुक्यातील देवारी येथील ६५ वर्षीय महिला, बाळापूर तालुक्यातील हिंगणा येथील ३५ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील ६० वर्षीय महिला, बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष, उगवा येथील ५५ वर्षीय महिला, रामदासपेठ येथील ८७ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी येथील ७४ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ५६ वर्षीय पुरुष, शरीफ नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, वल्लभ नगर येथील ७८ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. यासह अकोट येथील ४३ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष, बाळापूर तालुक्यातील उरळ येथील ५७ वर्षीय महिला, मूर्तिजापूर तालुक्यातील धानोरा येथील ६३ वर्षीय पुरुष, म्हैसपूर येथील ६४ वर्षीय पुरुष, अकोट तालुक्यातील पनज येथील ४० वर्षीय पुरुष, अकोट येथील ५२ वर्षीय महिला, अकोट येथील ४२ वर्षीय पुरुष, अकोट येथील ७० वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर येथील ४० वर्षीय महिला, ८५ वर्षीय पुरुष तसेच तेल्हारा येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतकांचा आकडा ८९१ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत ६८२० रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण (आरटीपीसीआर चाचणी)
तालुका - रुग्ण
मूर्तिजापुर -२६
अकोट -१६
बाळापूर -१२
तेल्हारा -५९
बार्शिटाकळी - ५४
पातूर -४७
अकोला -१२९ (ग्रामीण-३४, मनपा-९५)
४६१ रुग्णाना डिस्चार्ज
रुग्णसंख्या वाढीसोबतच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. शनिवारी ४६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४२०२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.