Corona Cases in Akola : आणखी ३७ पॉझिटिव्ह, १३७ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 07:19 PM2021-06-23T19:19:30+5:302021-06-23T19:19:43+5:30
Corona Cases in Akola : बुधवारी एकाही मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, बुधवार, २३ जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २४ व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १३ असे एकूण ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७,४८९ झाली आहे. दरम्यान, बुधवारी एकाही मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ८५१ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ८२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये १२ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी पार पडलेल्या ७५९ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
बार्शीटाकळी-पाच, अकोट-तीन, मुर्तिजापूर-तीन, तेल्हारा-सहा, अकोला-सात. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-सहा)
१३७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, खासगी कोविड रुग्णालयांमधील २३, तर होम आयसोलेशन मधील ११० अशा एकूण १३७ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४८० ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,४८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,८८७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.