Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, १० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 07:17 PM2021-06-29T19:17:46+5:302021-06-29T19:17:54+5:30
Corona Cases in Akola: अकोला शहरातील खदान भागातील ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, मंगळवार, २९ जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन अशा एकूण दहा नव्या रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, अकोला शहरातील खदान भागातील ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी एकूण ६२२ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी मुर्तिजापूर तालुक्यात एक, बाळापूर-एक, बार्शीटाकळी-एक, अकोट-एक व अकोला महानगर पालिका क्षेत्रात तीन असे एकूण सात जण पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ६१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी करण्यात आलेल्या ११५५ रॅपिड चाचण्यांमध्ये केवळ ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले.
३५ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील एक, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील २५ अशा एकूण ३५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३८६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,०६८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.