Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, सात कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:20 IST2021-07-05T18:20:24+5:302021-07-05T18:20:33+5:30
Corona Cases in Akola: तेल्हारा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,१२९ झाला आहे.

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, सात कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा सैल झाला असून, सोमवार, ५ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये दोन, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये पाच असे एकूण सात नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान, तेल्हारा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,१२९ झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी एकूण १३९ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अकोला ग्रामीण व अकोला शहरातील प्रत्येकी एक अशा दोघे पॉझिटिव्ह आढळून आले. रविवारी दिवसभरात झालेल्या ५११ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये मुर्तीजापूर येथील पाच जण पॉझिटिव्ह आहेत.
२० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, तर होम आयसोलेशन मधील १७ अशा एकूण २० जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
२३१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,६३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,२७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.