Corona Cases in Akola : एकाचा मृत्यू, १०० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:00 IST2021-06-08T19:00:05+5:302021-06-08T19:00:26+5:30
Corona Cases in Akola: ८ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११०५ झाला आहे.

Corona Cases in Akola : एकाचा मृत्यू, १०० पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोराेना संसर्गाची लाट ओसरत असून, मंगळवार, ८ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११०५ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६४, तर रॅपिड चाचण्यांमध्ये ३६ असे एकूण १०० जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आतापर्यंत बाधित होणाऱ्यांची संख्या ५६८०४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,११९अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण बोर्टा ता.मुर्तिजापूर येथील ५४ वर्षीय पुरुष असून, त्यांना जून रोजी दाखल केले होते.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापूर-१६, बार्शीटाकळी-तीन, पातूर-एक, बाळापूर-दोन, अकोट-१२, तेल्हारा-एक, अकोला- २९ (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-२८)
२८४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, आयुवेदिक महाविद्यालय येथील एक, खासगी रुग्णालयांमधील १४, तर होम आयसोलेशन मधील २५० अशा एकूण २८४ जणांना डिस्चार्ज मंगळवारी देण्यात आला.
२,३२३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,८०४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५३,३७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१०५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,३२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.