Corona Cases in Akola : आणखी पाच जणांचा मृत्यू, २१४ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:23 PM2021-05-24T19:23:57+5:302021-05-24T19:24:02+5:30
Corona Cases in Akola: आणखी पाच जणांचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३३ व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८१ असे एकूण २१४ नवे रुग्ण आढळून आले.
अकोला : कोरोना संसर्गाचा आलेख किंचित घसरणीला लागल्याचे चित्र असून, सोमवार, २४ मे रोजी जिल्ह्यात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३३ व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८१ असे एकूण २१४ नवे रुग्ण आढळून आले. कोरोनाबळींचा आकडा १०१५ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ५३९६९ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,७०२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,५६९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये त्यात, धनीगाव ता.बाळापूर येथील ६६ वर्षीय पुरुष, रामटेकपुरा ता.अकोट येथील ७१ वर्षीय महिला, सांगळूद येथील ७५ वर्षीय पुरुष, शांती नगर जूने शहर येथील ५३ वर्षीय महिला व गजानन नगर, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-२६, अकोट-२५, बाळापूर-एक, तेल्हारा-१४, बार्शी टाकळी-चार, पातूर-नऊ, अकोला-५४. (अकोला ग्रामीण-१७, अकोला मनपा क्षेत्र-३७)
४९४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २९, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, खासगी रुग्णालयांमध्यील ४६, तर होम आयसोलेशन मधील ४१० अशा एकूण ४९४ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,१२८ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३,९६९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४६,८२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १०१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,१२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.