Corona Cases in Akola : आणखी नऊ जणांचा मृत्यू, ३३० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:07 PM2021-05-26T19:07:25+5:302021-05-26T19:07:35+5:30
Corona Cases in Akola: आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १०३७ वर पोहोचला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी (दि. २५) आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १०३७ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५२, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये ७८ असे एकूण ३३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४,५८७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,४१३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,१६१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये चरणगाव ता. पातूर येथील ६० वर्षीय महिला, मोठी उमरी येथील २३ वर्षीय पुरुष, खेर्डा खु. ता.बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष, चोहट्टा बाजार येथील २८ वर्षीय महिला, संत कवर नगर, अकोला येथील ७३ वर्षीय पुरुष, काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय महिला, पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष, अकोला येथील ५२ वर्षीय पुरुष व मलकापूर येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-२६, अकोट-३१, बाळापूर-२६, तेल्हारा-१७, बार्शी टाकळी-१६, पातूर-२१, अकोला-११५. (अकोला ग्रामीण-२३, अकोला मनपा क्षेत्र-९२)
५२१ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, पीकेव्ही येथील सहा,जिल्हा परिषद कर्मचारी येथील तीन, खासगी कोविड रुग्णालयांमधील ४०, तर होम आयसोलेशन मधील ४२० अशा एकूण ५२१ जणांना डिस्चार्ज बुधवारी देण्यात आला.
५,६७५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४,५८७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४७, ८७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,६७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.