आणखी नऊ पॉझिटिव्ह, आठ जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 19:04 IST2021-07-10T19:03:46+5:302021-07-10T19:04:13+5:30
Corona Cases in Akola : नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७६८१ वर पोहोचली आहे.

आणखी नऊ पॉझिटिव्ह, आठ जणांनी केली कोरोनावर मात
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, शनिवार, १० जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये केवळ दोन, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये सात असे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७६८१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्य व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६६८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ अकोला व आकोट शहरातील प्रत्येकी एक असे दोघे पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या ७८४ रॅपिड चाचण्यांमध्ये सात जण पॉझिटिव्ह आढळून आले.
आठ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, अवघते हॉस्पिटल येथील एक, बिहाडे हॉस्पिटल येथील एक अशा एकूण आठ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,६८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १,१३० मृत झाले, तर ५६,५०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ४४ जणांवर उपचार सुरू आहेत.