Corona Cases in Akola : एक पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 18:49 IST2021-08-02T18:48:55+5:302021-08-02T18:49:02+5:30
Corona Cases in Akola: एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या ५७,७६७ झाली आहे.

Corona Cases in Akola : एक पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त
अकोला : : जिल्ह्यात सोमवारी (दि. २) आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या ५७,७६७ झाली आहे. दरम्यान, आणखी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून रविवारी १४२ संसर्ग चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अकोला शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रविवारी दिवसभरात झालेल्या ३६६ रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
४५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,७६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी ५६,५८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ११३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४५ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.