Corona Cases in Akola : ११३० चाचण्यांमध्ये केवळ ३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 18:41 IST2021-07-15T18:41:34+5:302021-07-15T18:41:42+5:30
Corona Cases in Akola: जिल्हाभरात करण्यात आलेल्या ११३० चाचण्यांमध्ये केवळ तीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली.

Corona Cases in Akola : ११३० चाचण्यांमध्ये केवळ ३ पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाला ब्रेक लागला असून, कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. गुरुवार, १५ जून रोजी सायंकाळी संपलेल्या २४ तासात जिल्हाभरात करण्यात आलेल्या ११३० चाचण्यांमध्ये केवळ तीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ४८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी ५७५ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अकोला मनपा क्षेत्रातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित ५७३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी दिवसभरात ५५५ रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, यामध्ये केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.
आठ जणांची कोरोनावर मात
उपजिल्हा रुग्णालयात मूर्तिजापूर येथील दोन व होम आयसोलेशनतील सहा, अशा एकूण आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ५७,७११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी ५६,५३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. १,१३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.