Corona Cases in Akola : आणखी दहा जणांचा मृत्यू, ६५४ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 06:58 PM2021-05-11T18:58:57+5:302021-05-11T18:59:02+5:30

Corona Cases in Akola: आणखी १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८२७ झाला आहे.

Corona Cases in Akola: Ten more killed, 654 new positive | Corona Cases in Akola : आणखी दहा जणांचा मृत्यू, ६५४ नवे पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : आणखी दहा जणांचा मृत्यू, ६५४ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, मंगळवार, ११ मे रोजी आणखी १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८२७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१३, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २४१ असे एकूण ६५४ रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ४६,९३० झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,४५४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये रेणूका नगर येथील ४१ वर्षीय पुरुष, वाडेगाव ता. बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला, बोरगाव मंजू येथील ६२ वर्षीय पुरुष, अन्वी मिर्झापूर येथील ८० वर्षीय पुरुष, पीकेव्ही वसाहत येथील ५१ वर्षीय पुरुष, पिंपरी खुर्द येथील ७५ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ५८ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय महिला आणि गांधीग्राम येथील २८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

 

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मुर्तिजापुर-५९, अकोट-नऊ, बाळापूर-५१, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-२९, पातूर-५०, अकोला-२१०. (अकोला ग्रामीण-४०, अकोला मनपा क्षेत्र-१७०)

५५२ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, केअर हॉस्पीटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील १३, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील आठ, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, लोहाना हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील २८, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, अवघते हॉस्पीटल येथील तीन, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४४५ अशा एकूण ५५२ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

६,५३९ उपचाराधीन रुग्ण

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६,९३० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३९,५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५३९ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Corona Cases in Akola: Ten more killed, 654 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.