Corona Cases in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, १९२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 06:58 PM2021-06-01T18:58:51+5:302021-06-01T18:58:56+5:30
Corona Cases in Akola : मंगळवार, १ जून रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,०७२ वर पोहोचला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरणीला लागला असून, मंगळवार, १ जून रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,०७२ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३३, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये ५९, असे एकूण १९२ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५५,८६९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,९०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७७४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये काळेगाव ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष, पिंपरी ता.अकोट येथील ८२ वर्षीय पुरुष व हिवखेड ता.तेल्हारा येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
४१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २१, खासगी कोविड रुग्णालयांमधील १८, तर होम आयसोलेशन मधील ३८० अशा एकूण ४१९ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५,८६९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५०,६७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०७२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.